केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये अनेक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या अंतर्गत सहाय्यक संचालक, वैज्ञानिक-बी, प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I, विशेषज्ञ ग्रेड III, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक) यासह अनेक पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक असलेले सर्व उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या पदभरती अंतर्गत एकूण १२० पदांची भरती करण्यात येत आहे. भरतीशी संबंधित अधिक तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आले आहेत.
पदभरतीचा तपशील :
संस्था : संघ लोकसेवा आयोग
एकूण रिक्त पदे : १२० जागा
दनिहाय जागांचा तपशील :
सहाय्यक संचालक : ५१ जागा
वैज्ञानिक-बी : १२ जागा
प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I : ०२ जागा
विशेषज्ञ ग्रेड III : ५४ जागा
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक) : ०१ जागा
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
वयोमर्यादा :
वरील कोणत्याही रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० ते ४५ वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रात :
सहाय्यक संचालक :
तीन वर्षांच्या अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल / मेकॅनिकल / कॉम्प्युटर सायन्स /माहिती तंत्रज्ञान (IT) / एरोनॉटिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स शाखेतील अभियांत्रिकीची पदवी
वैज्ञानिक-बी :
-मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून भौतिकशास्त्र / रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी; आणि
-मान्यताप्राप्त प्रयोगशाळा / संस्थेमध्ये विश्लेषणाच्या भौतिक पद्धती वापरून बांधकाम साहित्याच्या चाचणी/मूल्यांकनाचा एक वर्षाचा व्यावहारिक अनुभव
प्रशासकीय अधिकारी ग्रेड-I :
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेची पदवी
विशेषज्ञ ग्रेड III :
भारतीय वैद्यकीय परिषद कायदा, १९५६ (१९५६ चा १०२) मधील प्रथम अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूचीच्या भाग II (परवाना पात्रतेव्यतिरिक्त) मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त एमबीबीएस पदवी पात्रता.
अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (तांत्रिक) :
मर्चंट शिपिंग कायदा, १९५८ (१९५८ चा ४४) च्या कलम ७८ मध्ये निर्दिष्ट केल्यानुसार सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर) च्या पात्रतेचे प्रमाणपत्र किंवा उक्त कायद्याच्या कलम ८६ मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे समतुल्य.
अर्ज शुल्काविषयी :
पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज शुल्काविषयी सविस्तर माहिती मूळ जाहिरात आणि संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर तपासा.
महत्त्वाच्या लिंक्स :
https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php
केंद्रीय लोकसेवा आयोगावाच्या अंतर्गत असणाऱ्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणयासाठी येथे क्लिक करा.
केंद्रीय लोकसेवा आयोगावाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.