देशातील ट्रकची (Truck) खराब स्थिती पाहता भारत सरकारनं सर्व ट्रकमध्ये एसी केबिन अनिवार्य केल्या आहेत. 2025 पासून, सर्व नव्या ट्रकमध्ये फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन असतील, असं एक नोटीस जारी करत रस्ते वाहतूक मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. म्हणजेच, 2025 पासून प्रत्येक नव्या केबिनमध्ये फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन असणं अनिर्वाय आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक प्रयत्नांनंतर अखेर सरकारनं फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन अनिर्वाय करण्याच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित केली आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयानं शुक्रवारी रात्री एक अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेत मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की, 1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित सर्व N2 आणि N3 श्रेणीतील ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवली जाईल.
अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे की, वातानुकूलन यंत्रणांनी सुसज्ज असलेल्या केबिनची चाचणी अधिसूचित ऑटोमोटिव्ह मानकांनुसार केली जाईल. यामध्ये N2 आणि N3 श्रेणीतील व्यावसायिक वाहनांचा समावेश असेल.
या मानकांमुळे ट्रक उत्पादकांना AC सिस्टीमसह सुसज्ज केबिनसह चेसिस विकण्याचा मार्गही मोकळा होईल. सध्या, ट्रक बॉडी तयार करणारे बिल्डर्स फिट करतात. त्यामुळे ट्रकच्या डॅशबोर्डसह एसी केबिनमध्ये बदल करण्याची गरज भासणार आहे, त्यामुळे ट्रक उत्पादक कंपन्यांना आता ते स्वत: बसवावं लागणार आहेत. यामुळे केबिनमध्ये बसण्यासाठी वाहन बॉडी बिल्डर्सची गरज नाहीशी होईल. नॉन-प्रॉफिटेबल ऑर्ग्नायजेशननं 2020 मध्ये 10 राज्यांमध्ये ट्रक ड्रायव्हर्सचं सर्वेक्षण केलं होतं. ज्यामध्ये जवळपास अर्ध्याहून अधिक ट्रक ड्रायव्हर्सनी बऱ्याचदा थकल्यानंतर किंवा झोप येत असतानाही ते ट्रक चालवत असतात, या गोष्टी स्विकारल्या होत्या.
N2 आणि N3 कॅटेगरीत कोणती वाहनं आहेत?
N2 कॅटेगरी : या कॅटेगरीमध्ये ज्यांचं एकूण वजन 3.5 टनांपेक्षा जास्त आणि 12 टनांपेक्षा कमी आहे, अशा अवजड वाहनांचा समावेश होतो.