बुधवार दिनांक सात रोजी दुपारी एक वाजता भाजप तर्फे देशभरात गाव चलो अभियान राबविण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहर भाजप कडून शहरासह ग्रामीण भागात 11 फेब्रुवारी पर्यंत व्यापक जनसंपर्कासाठी घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार द्वारे दिली. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरातील प्रत्येक बुथ वरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. अभियानाला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात होऊन ते दिनदयाल उपाध्याय यांच्या 11 फेब्रुवारी रोजीच्या स्मृतिदिनांक पर्यंत सुरू झाली. अभियानात पक्षाची शहरातील माजी खासदार आमदार माजी नगरसेवक व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.यावेळी पैलवान अमृत भोसले, शहाजी भोसले, मनोज हिंगमिरे ,अश्विनी उबडगे,मिश्रालाल जादू आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.