Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :गणेशनगर येथील गटारीचे पाणी रस्त्यावर

इचलकरंजी येथील गणेशनगर गल्ली क्र. ६ येथील हरेकृष्ण मंदिराला लागून असलेल्या सारण गटारीचे पाणी जाण्यासाठी रस्त्यांमध्ये घातलेले पाईप फुटलेले आहे. वाहतूक करताना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर पाईप बदलून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे. या रस्त्यावर मोठे पाण्याचे टँकर तसेच सायझिंगसाठी मोठ्या प्रमाणात दिवस- रात्र वाहतूक सुरू असते. रात्रीच्या सुमारास वाहने या खड्ड्यामध्ये जाण्याची शक्यता आहे.