इचलकरंजी गुजरी पेठेतील एका दुकानाला लागली आग. आगीत दोन लाखांचे नुकसान.इचलकरंजी गुजरी पेठ येथील संपत अण्णा माळकर यांच्या दुकानाला मंगळवार दिनांक 27 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता शॉर्टसर्किटने आग लागली. या घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेची अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. यावेळी या दुकानांमध्ये असलेल्या फटाकड्या,मेणबत्ती, रांगोळी, अगरबत्ती, सोडा तसेच दुकानातील काउंटर व फर्निचर सह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आगीमध्ये सुमारे एक लाख 80 हजार ते दोन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकान मालक संपत अण्णा माळकर यांनी सांगितले. या अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर लागलेली आग बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. होती.