जगातील १६ वी मोठी रिइन्श्युरन्स (Reinsurance) कंपनीमध्ये ८५ असिस्टंट मॅनेजर (स्केल-१) ऑफिसर्स पदांवर भरती. (अजा – १२ अधिक २, अज – ६ अधिक १, इमाव – २६ अधिक ८, ईडब्ल्यूएस – ६, खुला – ३५) (३ पदे दिव्यांग Hr/ VI/ OC/ ID/ MD कॅटेगरीसाठी राखीव)
(१) असिस्टंट मॅनेजर (जनरल) – १६ पदे. पात्रता : (दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण. इष्ट पात्रता : पदव्युत्तर पदवी/ एम.बी.ए.
(२) असिस्टंट मॅनेजर (इन्श्युरन्स) – १७ पदे. पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण आणि जनरल इन्श्युरन्स/ रिस्क मॅनेजमेंट/ लाईफ इन्श्युरन्स/ FIII/ FCIL मधील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका उत्तीर्ण.
(३) असिस्टंट मॅनेजर (लीगल) – ७ पदे. पात्रता : कायदा विषयातील पदवी उत्तीर्ण. इष्ट पात्रता : LL. M./अनुभव. (सिव्हील/ सायबर).
(४) असिस्टंट मॅनेजर (एचआर) – ६ पदे. पात्रता : पदवी (कोणतीही शाखा) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि HRM/पर्सोनेल मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी.
(५) असिस्टंट मॅनेजर (स्टॅटिस्टिक्स) – ६ पदे. पात्रता : स्टॅटिस्टिक्स विषयातील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज – ५५ टक्के गुण) इष्ट पात्रता : पदव्युत्तर पदवी.
(६) असिस्टंट मॅनेजर (इंजिनिअरींग) – ११ पदे (सिव्हील – २, एअरोनॉटिकल – २, मरिन – १, पेट्रोकेमिकल – २, मेटॅलर्जी – २, मेरिओरॉलॉजिस्ट – १, रिमोट सेंसिंग/ जीओइन्फॉरमॅटिक्स/ जीओग्राफीक इन्फॉरमेशन सिस्टीम – १). पात्रता : संबंधित विषयातील इंजिनीअरींग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज – ५५ टक्के गुण)
(७) असिस्टंट मॅनेजर (आयटी) – ९ पदे. पात्रता – बी.ई./ बी.टेक. (CSE/ IT/ ECE/ ETC) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज – ५५ टक्के गुण) किंवा आर्ट्स/ सायन्स/ कॉमर्स/ अॅग्रिकल्चर/ मॅनेजमेंट/ इंजिनीअरिंग (CSE/ IT/ ECE/ ETC) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/ अजसाठी ५५ टक्के गुण) आणि MCA किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज – ५५ टक्के गुण) इष्ट पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि आयटी प्रोजेक्ट्स.
(८) असिस्टंट मॅनेजर (अॅक्च्युअरी) – ४ पदे. पात्रता : मॅथ्स/ सायन्समधील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/ अज – ५५ टक्के उमेदवाराने इन्स्टिट्यूट ऑफ अॅक्च्युअरिज सोसायटी ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट अॅण्ड फॅकल्टि ऑफ अॅक्च्युअरिज लंडन यांची CSs अनिवार्य आहे.)
(९) असिस्टंट मॅनेजर (इकॉनॉमिक्स) – २ पदे. पात्रता : इकॉनॉमिक्स/ इकोनोमॅट्रिक्समधील पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज – ५५ टक्के गुण) इष्ट पात्रता : पदव्युत्तर पदवी.
(१०) असिस्टंट मॅनेजर (मेडिकल) (M.B.B.S.) – २ पदे. पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज – ५५ टक्के गुण)
आणि इतर ७ पदे विस्तृत माहिती https:// gicre. in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. सर्व पदांसाठी खुला प्रवर्ग आणि इमाव प्रवर्गातील उमेदवारांसाठी पात्रता परीक्षेत ६० टक्के गुण मिळालेले असावेत. (अजा/ अजच्या उमेदवारांसाठी गुणांची अट आहे ५५ टक्के) उमेदवारांकडे संगणक कौशल्य अवगत असणे आवश्यक. (Computer Proficiency)
वयोमर्यादा : दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी २१ ते ३० वर्षे. (उमेदवाराचा जन्म २ ऑक्टोबर १९९३ ते १ ऑक्टोबर २००२ दरम्यानचा असावा.) (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – १० वर्षे; विधवा/परित्यक्ता महिला – ९ वर्षे; पब्लिक सेक्टर जनरल इन्श्युरन्स कंपनीमधील कार्यरत कर्मचारी – ८ वर्षे).
वेतन : रु. ८५,०००/- दरमहा अधिक इतर सोयी सुविधा.
निवड पद्धती : ऑनलाइन टेस्टमधून उमेदवार ग्रुप डिस्कशन आणि इंटरह्यूसाठी निवडले जातील.
ऑनलाइन टेस्टकरिता १५० गुण (ऑब्जेक्टिव्ह टाईप – १२० गुण) (वेळ ९० मिनिटे), (वर्णनात्मक प्रश्न – ३० गुण) (वेळ ६० मिनिटे). ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांकरिता चुकीच्या उत्तरांसाठी १/४ गुण वजा केले जातील. ग्रुप डिस्कशन – २० गुण आणि इंटरव्ह्यू – ३० गुण. निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला मुंबई येथील कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नेमणूक दिली जाईल.
अर्जाचे शुल्क : रु. १,०००/- अधिक १८ टक्के जीएसटी. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला/ GIC आणि GIPSA अंतर्गत कंपनीमधील कर्मचारी यांचेसाठी फी माफ आहे.)
लेखी परीक्षा : फेब्रुवारी, २०२४ मध्ये महाराष्ट्रातील पुढील केंद्रांवर घेतली जाईल. मुंबई/ नवी मुंबई/ ठाणे; नाशिक; पुणे; औरंगाबाद. निवडलेल्या उमेदवारांना १ वर्षाचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल. अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांसाठी ऑनलाइन प्रीरिक्रूटमेंट ट्रेनिंग तारखा नंतर जाहीर केल्या जातील. प्रोबेशन दरम्यान इन्श्युरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया घेत असलेली ऑन लाईफ लायन्ससिएट परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. उमेदवारांना कोणत्याही एका पदासाठी अर्ज करता येईल.
ऑनलाइन अर्ज https:// gicre. in या संकेतस्थळावर दि. १२ जानेवारी २०२४ पर्यंत करता येतील.