Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :आदर्श घरकुलासाठी मदत करणारः आम. प्रकाश आवाडे

इचलकरंजी येथील चौंडेश्वरी गृहनिर्माण संस्थेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. श्री देवांग समाजाच्या अधिपत्याखाली या गृहनिर्माण संस्थेने खूपच मोठी प्रगती केली आहे. गावचे भूमिपुत्र असलेल्या या समाजाच्या गृहनिर्माण संस्थेमध्ये आदर्श घरकूल उभारणीसाठी आकर्षक कॉलनी बनवण्यासाठी पूर्णतः मदत केली जाईल, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. यावेळी विविध मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते