Logo
ताज्या बातम्या

गॅस सिलिंडरच्या दरात सलग दुसऱ्या महिन्यातही वाढ; जाणून घ्या नवे दर

सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) बुधवारी (दि.१) देशभरातील अनेक ठिकाणी व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती १०० रुपयांनी वाढवल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. व्यावसायिक आणि घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी जाहिर केल्या जातात. नवीन दरानुसार १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता दिल्लीमध्ये १,७३१ रुपयांऐवजी १,८३३ रुपये होईल. मुंबईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १,७८५.५० रुपये, कोलकातामध्ये १,९४३ रुपये आणि चेन्नईमध्ये १,९९९.५० रुपये प्रति सिलेंडर उपलब्ध असेल. ऑक्‍टोबरमध्ये तेल कंपन्यांनी २०९ रुपयांनी दर वाढवल्यानंतर मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर १,६८४ रुपये, कोलकात्यात १,८३९.५० रुपये आणि चेन्नईमध्ये १,८९८ रुपये होते. घरगुती एलपीजीची गॅसच्या किंमत दिल्लीत प्रति १४.२ किलो सिलिंडर ९०३ रुपये कायम आहेत.