Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी शहराचे सुशोभिकरण करणार - आयुक्त ओमप्रकाश दिवटे

इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे यांनी लोकसहभागातून शहराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल, तैमूर मुलाणी, सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी परिसरातील कला महाविद्यालयाचे शिक्षक, कला शिक्षक, आर्टिस्ट यांच्या समवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीस शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे आदींसह अन्य उपस्थित होते.