Logo
ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. या संदर्भातील पोस्ट पीएम मोदी यांनी त्यांच्या अधिकृत X अकाऊंटवरून केली आहे. पीएम मोदी यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परिदृश्यावर अतुलनीय प्रभाव आहे. त्यांचे नेतृत्त्व, आदर्शांप्रती अखंड समर्पण आणि गरीब आणि दलितांबद्दल त्यांच्या बोलण्यातील वचनबद्धता यामुळे अगणित लोकांच्या हृदयात ते आहेत, असे देखील पीएम मोदी यांनी म्हटले आहे.