व्हिजन इचलकरंजी आयोजित माणुसकीची भिंत कार्यक्रमाच्या संदर्भात इचलकरंजीसह परिसरात नको असलेले द्या व पाहिजे असलेले घ्या या उपक्रमाला सुरुवात झाली असून, माणुसकीची भिंत फाउंडेशनच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये अनेक गोरगरीब गरजु विद्यार्थी, महिला व पुरुषांना याचा लाभ होत असतो. परिणामी आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूचा साठा व पुरवठा यावेळी मोठ्या प्रमाणात केला जातो.या माणुसकीची भिंत फाउंडेशनच्या वतीने सदर इचलकरंजी ग्रामस्थांना या उपक्रमाचे आव्हान करण्यात आले होते. दिवाळी कालावधीमध्ये सदर उपक्रम चालू राहणार असून व्हिजन इचलकरंजी माणुसकीची भिंत मदतीचा एक हात या अनुषंगाने फराळ ,कपडे व अन्य घरगुती साहित्याचे वितरण या ठिकाणी गोरगरीब व सर्वसामान्य आवश्यक असणाऱ्या महिला, पुरुष व गोरगरिबांना केले जाणार आहे. सदर उपक्रमाला इचलकरंजीसह परिसरात चांगल्या प्रमाणे प्रतिसाद मिळत असून अनेक नागरिक आपापल्या परीने माणुसकीची भिंत या उपक्रमाला सहकार्य करत असल्याचे चित्र दिसत आहे.