Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : गांधी पुतळा परिसरातील गवंडी कामगाराने केली आत्महत्या

इचलकरंजी येथील गांधी पुतळा परिसरातील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून गवंडी कामगाराने आत्महत्या केली. प्रीतकुमार दयाराम साहू (वय २२, सध्या रा. इचलकरंजी. मूळ रा. छत्तीसगड) असे त्याचे नाव आहे. याबाबतची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे. साहू याला दारूचे व्यसन होते. तो त्याच्या आई-वडिलांसोबत सेंट्रिंगचे काम करीत होता. त्याने सोमवारी (दि. १५) रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास येथील भारत गॅस गोदामाजवळ असलेल्या तांबे अकॅडमीच्या इमारतीवरून त्याने उडी मारली.