Logo
आरोग्य

आहारात 'या' पदार्थांचा समावेश तुमचे मानसिक आरोग्‍य सुधारेल

एखादी व्यक्ती जे खाते त्याचा थेट परिणाम त्याच्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर त्याच्या मानसिक आरोग्यावरही होतो. नैराश्य, चिंता आणि अनेक गंभीर मानसिक समस्या अन्नाशीही लित आहाराने माणूस अनेक मानसिक समस्यांपासून दूर राहू शकतो. जीवनसत्त्वे, प्रथिने देखील मानसिक आरोग्य राखण्यासाठी भूमिका बजावतात. ही सर्व पोषकतत्त्वे शरीराला अन्वनातूनच मिळतात. काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य कसे सुधारू शकता. फळे आणि भाज्यांचे सेवन केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटी-डिप्रेशन गुणधर्म असतात, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अनेक फळेही महत्त्वाची भूमिका बजावतात. वनस्पती-आधारित आहाराचा अवलंब करताना, व्यक्तीने विशेष काळजी घेतली पाहिजे की त्याच्या आहारात शुद्ध आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा समावेश नाही. मानसिक आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करू शकता. संपूर्ण धान्याचे सेवन शरीरासाठी खूप चांगले मानले जाते. हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सच्या श्रेणीत ठेवले जातात. यामुळे शरीरातील सेरोटोनिनचा स्राव वाढतो, ज्यामुळे मन प्रसन्न राहते. दलिया, बीन्स, तपकिरी तांदूळ, सोया आणि ओटस् ही संपूर्ण धान्याची उत्तम उदाहरणे आहेत. बीन्समध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असतात, जे स्मरणशक्ती मजबूत करतात. नटस्मध्ये फॅट असते,अक्रोड खाणे सर्वात फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑइल, फ्लेक्स सीड्स आणि नटस्मध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, जे मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. सागरी मासेही ’ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड’चे चांगले स्रोत असतात. मेंदूच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन बी12 खूप महत्त्वाची भूमिका बजावते. चीज हा त्याचा चांगला स्रोत आहे. त्याचप्रमाणे दुग्धजन्य पदार्थ रक्तातील ट्रिप्टोफॅनची पातळी वाढवतात, ज्यामुळे चांगली झोप लागते, जे चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे.