Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : पोहायला न आल्याने १२ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

पोहायला न आल्याने शाळकरी मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. अमोल सचिन गोसावी (वय १२, रा. गोसावी गल्ली, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. मित्रांनी त्वरित नातेवाइकांना बोलावून त्याला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास कोरोची येथे घडली. येथील गोसावी गल्ली भागात अमोल गोसावी हा कुटुंबासोबत राहत होता. अमोल हा मित्रांसोबत विहिरीत पोहायला गेला होता. मित्र पोहत असताना अचानक तो विहिरीत पडला.