Logo
ताज्या बातम्या

दोन वर्षांचे ‘ते’ बी.एड. कायमचे बंद; २०२४-२५ पासून आता ४ वर्षांचा कोर्स

दोन वर्षांचा बी.एड. (विशेष शिक्षण) अभ्यासक्रम कायमचा बंद झाला आहे. पुढील शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ पासून केवळ चार वर्षांच्या बी.एड. अभ्यासक्रमाला मान्यता दिली जाईल, असे रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या (आरसीआय) परिपत्रकात म्हटले आहे. एनसीटीईने नवीन शैक्षणिक धोरण-२०२० (एनईपी)अंतर्गत एकात्मिक शिक्षक शिक्षण कार्यक्रमात (आयटीईपी) चार वर्षांच्या बी.एड.ची तरतूद केली आहे. त्यामुळे आरसीआयनेही तसा निर्णय घेतला आहे. येत्या सत्रापासून ४ वर्षांच्या अभ्यासक्रमालाच मान्यता मिळेल असे, आरसीआयचे सचिव विकास त्रिवेदी यांनी म्हटले आहे. नव्या अभ्यासक्रमात काय? बी.एड.च्या विशेष शिक्षण अभ्यासक्रमात दिव्यांग मुलांना शिकविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. श्रवण, वाक्, दृष्टिदोष, मानसिक अपंगत्व असलेल्यांना शिक्षण देऊ इच्छिणाऱ्यांसाठी अभ्यासक्रम चालविला जातो. चार वर्षांचा अभ्यासक्रम चालवू इच्छिणाऱ्या संस्था अर्ज करू शकतील, असे आरसीआयने म्हटले आहे.