Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :प्रा. डॉ. प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित

इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने कन्या महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण प्रमुख वक्ते शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर माजी नगरसेवक नितीन जांभळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत सारडा, प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे, उपाध्यक्ष अरुण काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.