मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव मुंबईत 20 जानेवारीपासून येण्यास सुरुवात होतील. त्यामुळे आझाद मैदानात भव्य मंडप उभा करावा, अशा सूचना मराठा क्रांती मार्चा, महामुंबईच्या बैठकीत करण्यात आल्या. (Maratha Reservation) कुर्ला (पूर्व) येथील केदारनाथ मंदिर हॉलमध्ये मंगळवारी सायंकाळी पहिली बैठक झाली. या बैठकीस मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख वीरेंद्र पवार, प्रशांत सावंत यांच्यासह मराठा बांधवांनी मते व्यक्त केली.
या बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नी जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या नियोजनबाबत उपस्थितांना संपूर्ण माहिती तसेच विभागवार जबाबदारी , सहकार्य, मदत कशाप्रकारे करायची, याची माहिती देण्यात आली. यावेळी वीरेंद्र पवार म्हणाले, जरांगे-पाटील हे पायी येणार असल्याने मुंबईत दहा ते 15 दिवसानंतर येतील असा,अंदाज आहे. पण मराठा बांधव 20 पासून मुंबईत येण्यास सुरुवात होईल. त्यासाठी आझाद मैदानात भव्य मंडप उभा करा.
यावेळी प्रशांत सावंत यांनी मराठा आरक्षण दिंडीचा संपूर्ण मार्ग सांगितला. दरम्यान,अंतरवाली सराटी येथील मराठा क्रांती मोर्चाचा अहवाल या बैठकीत मांडण्यात आला. त्याला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला.