Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :पाणी प्रश्न मार्गी लागण्यासाठी जलकुंभची मागणी :आमदार प्रकाश आवाडे

इचलकरंजीतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या सहा जलकुंभ उभारणीचे काम तातडीने सुरु करावे अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. यावेळी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिका-यांनी जलकुंभ संदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. त्याचबरोबर इचलकरंजीसाठी 30 हजार हॉर्सपॉवर वीजेची आवश्यकता असून त्याबाबतही मागणी मांडली.