रेल्वे प्रवाशांना आरामदायी आणि वेगवान प्रवासी सुविधा देण्यासाठी केंद्र सरकार पुढील तीन वर्षांत ४०० ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरू करणार आहे. पूर्णतः भारतीय बनावटीच्या ‘वंदे भारत 2.0’ श्रेणीतील सेमी हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला केंद्र सरकार प्रोत्साहन देणार आहे.
५० हजार कोटींचा खर्च
एक ‘वंदे भारत’ रेल्वे तयार करण्यासाठी किमान ११५ कोटींचा खर्च येतो. त्यानुसार पुढील ३ वर्षांत ४०० ‘वंदे भारत’ सेवेत आणण्यासाठी जवळपास ५० हजार कोटींचा खर्च येणार आहे. तसेच या माध्यमातून रोजगारनिर्मिती वाढण्यास मदत होणार आहे.
वैशिष्ट्येः
‘वंदे भारत २.०’मध्ये कमाल वेगमर्यादा १८० कि.मी. प्रतितास तसेच रेल्वेचे वजन ४३० टनांवरून ३९२ टनांपर्यंत कमी केले.
नव्या ‘वंदे भारत’मध्ये कवच (अपघातविरोधी प्रणाली) सुविधेसह ६५० मि.मी.पर्यंतच्या पुराचा सामना करण्यास सक्षम अशी डब्याखालील इलेक्ट्रिक उपकरणे
पूर्वीच्या १४५ सेकंदांच्या तुलनेत नव्या श्रेणीत अवघ्या १४० सेकंदांत १६० प्रतितास वेग गाठण्याची क्षमता.
‘वंदे भारत 2.0’ सेवेत
नवी दिल्ली ते वाराणसी या देशातील पहिल्या ‘वंदे भारत’ रेल्वेला १५ नोव्हेंबर २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर ‘वंदे भारत 2.0’ ही अद्ययावत सेवा ३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई ते गांधीनगरदरम्यान सुरू झाली.
२५% - प्रवासवेळेत बचत
४०% - इतर रेल्वेंच्या तुलनेत अधिक वेगवान
३०% - रिजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणालीमुळे वीजवापरात बचत