Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी : आजपासून व्याख्यानमाला सुरू, स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह

इचलकरंजीत आजपासून व्याख्यानमाला सुरू, स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त रामकृष्ण सत्संग मंडळातर्फे व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे ३८ वे वर्ष आहे. मंगळवारी ता. ९ श्री. सारडा मठ पुण्याचे पू. प्र. निरंजनप्राणा यांचे अहंकारविमुढात्मा या विषयावर, कोल्हापूरचे पूज्य स्वामी बुद्धानंद यांचे आजच्या परिस्थितीत स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान होणार आहे. दररोज सायंकाळी साडेसहा वाजता गायत्री भुवन येथे होणाऱ्या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.