महेश क्लबच्या वतीने नेत्रचिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. मंगळवारी (ता. ९) सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हे शिबिर मंगलमूर्ती चित्रमंदिरजवळ महेश क्लब येथे होईल. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश चिटणीस यांच्या मारहाणीचा येथील सभासदांनी निषेध केला. पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रकाश पाटील (काका), माजी संचालक शिवगोंडा आवटे, मारुती कोळी, रानोजी भाणसे आदी उपस्थित होते.