Logo
राजकारण

उद्धव ठाकरेंचा 'या' दिवशी नाशिक दौरा; सांगितले कारण

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज (दि.६) माध्यमांशी बोलत असताना नाशिक दौऱ्या संदर्भात माहिती दिली आहे. ते बोलत असताना म्हणाले, “आम्ही नाशकात येत्या २२ जानेवारीला काळाराम मंदिरात जावू. तर २३ जानेवारी नाशिकात सभा आणि शिबीर होईल.” जाहीर सभा आणि शिबीर मीनाताई ठाकरे यांची आज (दि.६) जयंती. त्यानिमित्ताने शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते सपत्निक आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. बोलत असताना ते म्हणाले की, “प्रभू रामचंद्र हे काही काळ पंचवटीला वास्तव्याला होते. त्यांच्या वास्तव्याने तो भाग पावन झाला आहे. हे पावित्र्य लक्षात घेवून आम्ही २२ जानेवारी संध्याकाळी गोदाकाठी महाआरती घेवू. २३ जानेवारी हा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. त्या निमित्ताने शिवसेनेचे शिबीर नाशिकात होणार आहे. संध्याकाळी गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा घेणार असल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान 1995 ला नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन झाले होते. त्यानंतर शिवसेनेची सत्ता आली होती. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये पुन्हा शिवसेनेचे अधिवेशन होते आहे.