Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :विद्यार्थ्यांमधील कलागुणांच्या विकासासाठी स्पर्धा :उद्घाटन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या उपस्थित

बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह परीक्षक, पदाधिकारी उपस्थित होते. शहराला संस्थान काळापासून नाट्य, संगीत व कला परंपरा लाभलेली आहे. ती सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची आहे. हीच परंपरा जपण्यासाठी बालनाट्य स्पर्धेसारखे उपक्रम उपयुक्त ठरणारे आहेत. विद्यार्थ्यांमधील कलागुणांचा विकास होण्यासाठीही या स्पर्धा महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले.