देशासह राज्यात सध्या थंडीची लाट पाहायला मिळत असून पुढील काही दिवसात हवामानात बदल होताना पाहायला मिळत आहे. देशासह राज्यातही काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे.
राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता
पुढील 48 तासांत राज्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. यामुळे देशासह राज्यात काही ठिकाणी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे.
पुढील दोन ते तीन दिवस वरुणराजा बरसणार
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या हवामानावरही परिणाम होणार आहे. पुढील काही दिवसात मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे.
पुढील काही दिवसात हवामानात मोठा बदल
अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही पुढील काही दिवसात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा वेग वाढणार असून याचा परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असून हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
हिवाळ्यात उष्णता आणि पावसाळा
राज्यात पुढील काही दिवसात हिवाळ्यात उष्णता आणि पावसाळा दोन्ही अनुभवावा लागणार आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. राज्यात सकाळी आणि रात्री थंडी आणि दिवसा ढगाळ वातावरणासह असल्याने उष्णतेत वाढणार आहे. दरम्यान, किमान तापमानात वाढ होणार आहे. राज्यात पुढील 48 तास पावसाची शक्यता आहे, त्यानंतर पुन्हा तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आधीच अवकाळी पावसाने शेतकरी मोठ्या प्रमाणात हवालदील झाला आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे.