महाराष्ट्र राज्यामध्ये आज देखील बहुतांश अशी कुटुंबे आहेत की ते आज देखील दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठी रोजगाराची कोणतेही साधन उपलब्ध नाही, त्यामुळे त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा देखील पूर्ण करता येत नाहीत, त्यामुळे अशा कुटुंबातील मुलांची व मुलींची शिकण्याचे इच्छा असते परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते असमर्थ ठरतात. आणि शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास देखील होत नाही, आज देखील सध्याच्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये अशा अनेक मुली आहेत की त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना मुलांच्या शिक्षणा एवढे मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. अनेक ठिकाणी भ्रूणहत्या सारखे प्रकार घडतात. त्यामुळे आज देखील मुली उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश
Savitribai Phule Scholarship Scheme राज्यातील इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज/ विमाप्र प्रवर्गाच्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
● राज्यातील शिक्षणामध्ये मुलींचे संख्या वाढावी, तसेच कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना सुरू केली आहे.
● या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मुलींमध्ये शैक्षणिक गुणवत्ता असून देखील मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यासाठी योजनेच्या माध्यमातून मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा देखील या योजने मागील उद्देश आहे.
● सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलांच्या शिक्षणामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणे.
● मुलींना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनवणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे.
● राज्यातील मुलींबाबत असणारे नकारात्मक विचार त्यामध्ये बदल करून जनतेमध्ये सकारात्मक विचार करण्यासाठी बदल घडवून आणणे.
● आर्थिकदृष्ट्या गरीब मागास असलेले कुटुंब मुलींसाठी पैसे भरून शिक्षण देऊ शकत नाहीत अशा मुलींना आर्थिक दृष्ट्या मदत करणे व त्यांना शिक्षणासाठी मदत करणे हे देखील या योजनेमागाचे उद्देश आहे.
● शिक्षण घेण्यासाठी मुलींनी कुटुंबाकडे कोणत्याही प्रकारे पैशासाठी आग्रह करू नये किंवा कोणत्याही बँकेतून कर्ज काढून त्याच्यावरती व्याज भरण्याची वेळ येऊ नये तसेच पैशासाठी कोणतेही नातेवाईकाकडे हात पसरायला लागू नये यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही योजना सुरू केली आहे.
● क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या शिक्षणामध्ये भर पडणार आहे त्यामुळे शासनाने या योजनेवर अधिक भर दिलेला आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
1. Savitribai Phule Scholarship Scheme महाराष्ट्र राज्यातील इयत्ता पाचवी ते सातवी मध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व विजाभज/ विमाप्र प्रवर्गातील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे.
2. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात रे या योजनेचे सुरुवात करण्यात आलेली आहे.
3. मुलींनी शिक्षण घेण्यात यावे यासाठी या योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक सहाय्य देऊन मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त केले जाते.
4. ग्रामीण भागातील मुलींसाठी ही एक महत्त्वाची योजना ठरलेली आहे.
5. या योजनेची प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे अर्जदार मुलींनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे मुलींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
6. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी सुद्धा आर्थिक सहाय्य दिले जाते.
7. या योजनेमध्ये दिली जाणारी लाभाची रक्कम ही विद्यार्थिनीच्या राष्ट्रीयकृत खात्यामध्ये डी.बी.टी च्या साह्याने जमा करण्यात येते.
शिष्यवृत्ती चा लाभ घेणाऱ्या मुलींसाठी महत्त्वाच्या सूचना
● Savitribai Phule Scholarship Scheme योजना या योजनेसाठी विहित केलेल्या तरतुदीनुसार नियम व अटीची पूर्तता करीत असलेल्या विद्यार्थिनींनीच अर्ज करावेत.
● सदरची योजना ही फक्त मुलींसाठी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज या योजनेसाठी करू नये.
● क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज भरताना अचूक व परिपूर्ण माहिती भरावी व अर्ज सोबत विचारलेली संपूर्ण कागदपत्रे जोडावी.
● ज्या मुलींनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत त्या मुलींनी राष्ट्रीयकृत बँकेतच खाते काढावे.
● अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज सोबत आवश्यक त्या कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी
● राज्यातील इयत्ता 5वी ते 7वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज/विमाप्र प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या जी गरीब कुटुंब आहेत, अशा मुलीं सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता
● सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थिनी ही महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी नियम व अटी/शर्ती
● फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी ही योजना सुरू आहे.
● महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जे वास्तव्यास आहेत अशा मुलींसाठी ही योजना लागू नाही.
● क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही फक्त 5वी ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींसाठीच ही योजना सुरू आहे.
● अर्जदार विद्यार्थिनी केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवत असेल तर अशा विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
● महाराष्ट्र राज्यातील फक्त मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जातो.
● अर्जदार मुलीचे आई-वडील जर शासकीय नोकरीमध्ये काम करत असतील तर त्या विद्यार्थिनीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
● अर्जदार मुलगी ही शासनमान्य शाळेमध्ये नियमित शिकणारी असायला हवी.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. रेशन कार्ड
3. रहिवासी दाखला
4. ई-मेल आयडी
5. मोबाईल नंबर
6. पासपोर्ट साईज आकाराचे फोटो
7. मागील वर्षाचे गुणपत्रकाचे झेरॉक्स प्रत
8. वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदाराने दिलेला दाखला
9. राष्ट्रीयकृत बँकेचे खाते त्याची झेरॉक्स प्रत
10. शपथ पत्र
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
ऑफलाईन पद्धत :
● अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
● जिल्हा कार्यालय मध्ये गेल्यानंतर तिथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात जाऊन अर्ज घ्यावा
● अर्जात विचारलेले सर्व माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे त्यासोबत जोडावी.
● सदर कार्यालयात भरलेला अर्ज व सोबत जोडलेले कागदपत्रासहित अर्ज जमा करावा.
● अशा प्रकारे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अंतर्गत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.
ऑनलाईन पद्धत :
● अर्जदार विद्यार्थिनीला सर्वप्रथम या क्लिक करा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
● शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर समोर एक होमपेज ओपन होईल.
● होमपेजवर तुम्हाला तुमचा युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
● लॉगिन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
● आता पुढे तुम्हाला शिष्यवृत्ती संदर्भात संबंधित माहिती संपूर्ण विचारली जाईल ती तुम्ही योग्यरीता अचूक पद्धतीने भरायचे आहे व शेवटी सबमिट या बटणावर क्लिक करून अर्ज पूर्ण करायचा आहे.
● अशा पद्धतीने तुमची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना नंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अधिकृत वेबसाईट > अधिकृत वेबसाईटला क्लिक करा
हेल्पलाइन नंबर – (022) 22621934
ई-मेल आयडी – regionofficemumbai21@gmail.com
eschol.support@maharashtra.gov.in