घरफाळा भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. त्यामुळे शासकीय सुटी असली तरी शनिवारी (ता. ३०) व रविवारी (ता. ३१) या दोन्ही दिवशी घरफाळा व पाणीपट्टी जमा करता येणार आहे. या दोन्ही दिवशी मुख्यालयासह चारही विभागीय कार्यालयात घरफाळा विभाग सुरू राहणार आहे. या दोन्ही दिवशी सकाळी १० ते सांयकाळी ५ या वेळेत मिळकतधारकांना घरफाळा व पाणीपट्टी भरता येणार आहे. ३१ डिसेंबरनंतर संयुक्त करावर २ टक्के दंडात्मक आकारणी केली जाणार आहे.