पंचगंगा नदीपात्रात आलेले जलपर्णीचे संकट थोपविण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सक्रिय झाली आहे. आरोग्य विभागाकडील दहा जणांचा एक गट घाट परिसरातील जलपर्णी काढण्यासाठी नियुक्त केला आहे. उद्यापासून जलपर्णी काढण्यास प्रारंभ होणार आहे. बोटीच्या सहाय्यांने ही जलपर्णी काढण्यात येणार असून पाणीपुरवठा व वाहन विभागाचे सहकार्य घेतले जाणार आहे. तर पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे येणारी जलपर्णी रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. पंचगंगा नदीपात्र पुन्हा एकदा जलपर्णीने व्यापले आहे.