Logo
राजकारण

आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, २० जानेवारीला मुंबईकडे चला-मनोज जरांगे-पाटील

सण, उत्सव, लग्न समारंभ बाजूला ठेवा आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन मराठा आरक्षण मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजाला केले आहे. दरम्यान, शनिवारी २० जानेवारी सकाळी ९ वाजता आंतरवलीतून मुंबईकडे पायी मोर्चा निघणार असल्याचे देखील जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. ते आज (दि.२८) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, मराठा शेतकऱ्यांनो शेतीची कामे आवरून घ्या. लग्न, उत्सव कार्यक्रम बाजूला ठेवा अन् मराठा आरक्षणासाठी तुमच्या पुढील पिढीसाठी या मोर्चात सहभागी व्हा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी राज्यातील मराठा समाजाला दिले आहे. एकदा बाहेर पडलो तर आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, असा निर्धार देखील जरांगे पाटील यांनी केला. प्रत्येकाची सोय प्रत्येकांने करायची आहे. तुम्हाला आवश्यक असणारे साहित्य हे तुमच्या सोबतच आणायचा आहे, असे हे जरांगे पाटील यांनी सांगितली. आंतरवली सराटी अहमदनगर वाशी मार्गे मुंबईत पायी दिंडी प्रवेश करणार आहे. आंतरवली सराटीतून निघालेला पायी मोर्चा थेट आझाद शिवाजी पार्कवर मोर्चा धडकणार आहे. शनिवारी (दि.२०) जानेवारीला मराठा मोर्चा आंतरवलीतून निगाल्यानंतर बीडमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, मराठा आंदोलन ज्या मार्गाने जाणार त्या मार्गातील गावांना मोर्चेकरांना सहकार्य करा असे आव्हान देखील मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. राज्यात ५४ लाख नोंदी मराठा कुणाबी नोंदी सापडल्या आहेत. ही संख्या कमी नाही, त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही, असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केला आहे.