Logo
ताज्या बातम्या

इंचलकरंजी : येथील नियोजित न्याय संकुलाच्या जागेची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी केली पाहणी

इचलकरंजीत प्रस्तावित न्याय संकुल होणे गरजेचे असून त्यासाठी राज्य शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक ते अंदाजपत्रक तयार करून त्याचा अहवाल पाठवावा. मे महिन्यात आपण पुनश्च इचलकरंजीत आल्यानंतर न्याय संकुल कामात सकारात्मकता दिसायला हवी अशी, सूचना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी दिले.येथील नियोजित न्याय संकुल आणि न्यायाधीश निवासस्थानाच्या जागेची न्यायमूर्ती बोरकर यांनी इचलकरंजी येथे रिंग रोडवर नियोजित न्याय संकुल आणि रुग्गे मळ्यात न्यायाधीश निवासस्थान उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित जागांची पाहणी करण्यासाठी न्यायमूर्ती अमित बोरकर महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून न्याय संकुल जागेचा विस्तृत नकाशा आणि न्याय संकुलाच्या आरक्षित जागेची माहिती जाणून घेतली आहे. यावेळी न्यायमूर्ती बोरकर यांनी या न्याय संकुलाची ग्रीन इमारत उभारण्यासाठी प्रयत्नशील असून, त्याबाबत महानगरपालिका ,बार असोसिएशन, सार्वजनिक बांधकाम विभागाने सक्रीय होऊन काम करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जलद गतीने अंदाजपत्रकासह नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर न्यायमूर्ती बोरकर यांनी प्रस्तावित न्यायाधीश निवासस्थान जागेला भेट दिली. त्या ठिकाणची उर्वरित संरक्षण भिंत तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना केल्यात. दरम्यान त्यांनी इचलकरंजी बार असोसिएशन ला भेट होऊन वकील क्षेत्र हे सामाजिक क्षेत्राशी संबंधित असून वकिली व्यवसायाकडे प्रोफेशनच्या दृष्टीने पाहण्याचा आवाहन केले. यावेळी बार असोसिएशन चे उपाध्यक्ष अडवोकेट डी एम लटके, सचिव एडवोकेट राजीव शिंदे, एडवोकेट सुनील कुलकर्णी, एडवोकेट बी.डी.जाधव उपस्थित होते.