Logo
ताज्या बातम्या

आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा! वेळ, सुतक काळ जाणून घ्या

आज होणारे चंद्रग्रहण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होईल. हे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. याशिवाय हे चंद्रग्रहण नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, इंडोनेशिया, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, हिंद महासागर, प्रशांत महासागर आणि इतर ठिकाणीही दिसणार आहे. ग्रहण काळात हे काम करू नका असे मानले जाते की ग्रहण काळात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो, त्यामुळे या काळात अनेक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ग्रहण काळात केलेल्या कामाचे शुभ फळ मिळत नाही. ग्रहण काळात देवाच्या मूर्तीला हात लावू नये. या काळात ब्रह्मचर्य पाळावे. ग्रहण काळात काहीही खाऊ किंवा पिऊ नये. यावेळी देवाची पूजा करावी.