शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्याची योग्य ती प्रक्रिया केल्यानंतरच विल्हेवाट लावावी, असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांनी महापालिकेस दिले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, असेही त्यांनी आदेशात नमूद केले आहे. पंचगंगा नदीमध्ये निर्माण झालेल्या जलपर्णीवर महापालिकेकडून तणनाशक औषध फवारणी केली होती. शहरात दररोज २२ दशलक्ष लिटर सांडपाणी थेट पंचगंगा नदीस सोडण्यात येत आहे.