अख्या जगाला वस्त्र पुरवणारा असंघटीत विणकर हा माञ शासनाच्या कोणत्याच सोयी सुविधा नसल्याने वंचित, उपेक्षित राहून अनेक समस्यांना तोंड देत जगण्याची कसरत आहे. त्याच्या कामाचे मोल जाणून त्याची आर्थिक व सामाजिक उन्नती व्हावी, यासाठी शासनाने इच्छाशक्ती दाखवण्याऐवजी नाकर्तेपणा दाखवण्यात मोठी धन्यता मानली आहे. विणकरांच्या न्याय- हक्कासाठी राष्ट्रीय विणकर सेवा संघाने विणकरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे यासह विविध मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे.