इचलकरंजी येथील काळा मारुती मंदिर रौप्य महोत्सव वर्धापन दिनानिमित्त मुख्यदिवशी तब्बल 900 किलो फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिर आणि गाभाऱ्याचे नेत्र दीपक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरुवात झाली असून, दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती.दरम्यान श्री राम चरित्र मानस, रामायणामध्ये प्रभू श्रीराम व माता सीता यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. काळा मारुती मंदिर सुमारे दोनशे वर्षांपूर्वीची संस्थान काळातील आहे. मंदिराची वैशिष्ट्ये असे आहेत की हनुमानाची मूर्ती दर्शन असून उजव्या हातात संजीवनी व डाव्या हातात गदा असून नवसाला पावणारा मारुती अशी ख्याती आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळमारूती आरती भक्त मंडळ वर्धापन दिनाचे औचित्य साधून तेरा डिसेंबर पासून विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली. यामध्ये दररोज दोन ते सहा यावेळी मराठी रामचरित्र मानस सामुदायिक संगीत, पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परिणामी सदर मंदिरात इथून पुढे दोन दिवस विविध कार्यक्रम चालणार असून त्यासाठी नाऊशे किलो फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली आहे. सदर मंदिरात हजारो भाविक सदिच्छा भेट घेत आहे.