आयकर विभागात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे आयकर विभागांतर्गत कर सहाय्यक, हवालदार पदांच्या एकूण २९ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. आयकर विभाग भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव – कर सहाय्यक, हवालदारएकूण पदसंख्या – २९
शैक्षणिक पात्रता –
कर सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
हवालदार – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास किंवा समकक्ष.
वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३अधिकृत वेबसाईट – incometaxmumbai.gov.in
पगार –
कर सहाय्यक – २५ हजार ५०० रुपये ते ८१ हजार १०० रुपये महिना.
हवालदार – १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये महिना.
असा करा अर्ज –
भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३०३ नोव्हेंबर २०२३ आहे.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/15gLwtNEKRn2onkBul_DgbMKy4obCAFTc/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.