Logo
ताज्या बातम्या

नोकरीची संधी ! इंजिनीअरिंग पदवीधर उमेदवारांची ऑफिसर पदावर भरती : ऑनलाइन अर्ज

प्रादेशिक सेना (Territorial Army) मध्ये पुरुष/ महिला इंजिनीअरिंग पदवीधर उमेदवारांची ऑफिसर पदावर भरती. प्रादेशिक सेना अधिकारी बनून राष्ट्राची सेवा करण्यासाठी लाभप्रद रोजगार (Gainfully Employed) असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (त्यांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पॅरा १४ मधील विहीत नमुन्यातील सर्टिफिकेट सादर करावे लागेल.) एकूण रिक्त पदे – ६. टेरिटोरियल आर्मी हे पूर्ण वेळ करियर नव्हे , या सर्व्हिससाठी पेंशन दिले जात नाही. निवडलेल्या उमेदवारांना लेफ्टनंट रँकवर कमिशन्ड् ऑफिसर म्हणून तैनात केले जाते. त्यांना वेतन आणि इतर भत्ते व इतर सोयीसुविधा रेग्युलर आर्मी ऑफिसरप्रमाणे दिल्या जातील. लेफ्टनंट कर्नल पदांपर्यंतचे प्रमोशन्स ठरलेल्या निकषांनुसार दिले जातील. ब्रिगेडियरपर्यंतचे प्रमोशन्स सिलेक्शन पद्धतीने दिले जातील. टेरिटोरियल आर्मीमधील कमिशण्ड ऑफिसर्सना गरज असल्यास अधिक कालावधीसाठी मिलिटरी सर्व्हिस करिता बोलाविले जाऊ शकतात. (i) बी.ई./ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/ आयटी अॅण्ड टेलीकॉम) बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स/ आयटी) पदवीला किमान ६० टक्के गुण मिळालेले असावेत. (ii) पुढे दिलेल्या क्षेत्रातील कोणत्याही एका अथवा अधिक सर्टिफिकेशन मिळविली असावीत. (ए) वेब अॅप्लिकेशन सिक्युरिटी आणि पेनीट्रेटिंग टेस्टींग (OSCP, OSEP, OSWA, OSWE). (बी) रेड टिमिंग ऑपरेशन्स (CRTP, CRTE) (सी) कॉम्प्युटर नेटवर्क्स आणि इन्फॉरमेशन सिस्टीम (CCNA, CEH, LPT) (डी) क्लाऊड कॉम्प्युटींग (Azure Avqq, AWS क्लाऊड सिक्युरिटी स्पेशालिटी) (इ) मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट (Android), experience in Mobile Development using Java/ Kotlin/ Flutter react native इष्ट पात्रता : एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स किंवा सायबर सिक्युरिटी) किंवा सायबर क्षेत्रातील २ वर्षं किंवा अधिक वर्षांचा कामाचा अनुभव. आर्मी/ नेव्ही/ एअर फोर्स/ पोलीस/ ॅफएा/ पॅरा मिलिटरी फोर्सेसमधील उमेदवार पात्र नाहीत. निवड पद्धती : (ए) निवड प्रक्रिया ४ स्तरांमध्ये (Phases) घेतली जाईल. (i) फेज-१ – कागदपत्र पडताळणीनंतर उमेदवारांची मेरिट लिस्ट बनवून शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर दिले जातील. (ii) प्रोफिशियन्सी टेस्ट – (अ) फेज-२ – १०० गुणांची ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा यातून ६० टक्के गुण मिळविणारे उमेदवार प्रॅक्टिकल टेस्टसाठी निवडले जातील. लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे. (ब) फेज-३ – प्रॅक्टिकल टेस्ट – १०० गुणांची यात पात्र ठरणारे उमेदवार इंटरह्यूकरिता बोलाविले जातील. उमेदवारांनी स्वत:चा लॅपटॉप आणणे आवश्यक आहे. (iii) फेज-४ – इंटरव्ह्यू – (३०० गुणांसाठी) जानेवारी २०२४ मध्ये घेतले जातील. (बी) इंटरव्ह्यूमधून निवडलेले उमेदवारांना आर्म्ड फोर्सेस क्लिनिक, नवी दिल्ली येथे मेडिकल टेस्ट द्यावी लागेल. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन घेऊन अंतिम निवड केली जाईल. ट्रेनिंग : ६ महिन्यांचे प्री-कमिशन ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना टेरिटोरियल आर्मीमध्ये कार्यान्वित (be commissioned) केले जाईल. वयोमर्यादा : अर्ज करण्याच्या दिवशी १८ ते ४२ वर्षे. शारीरिक मापदंड : उमेदवार फिजिकली आणि मेडिकली फिट असावा. वेतन : ट्रेनिंगमध्ये असताना आणि मिलिटरी सर्व्हिस दरम्यान ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाप्रमाणे पे-लेव्हल – १०, मूळ वेतन रु. ५६,१००/- अधिक मिलिटरी सर्व्हिसेस पे रु. १५,५००/- अधिक डी.ए. व इतर भत्ते मिळून अंदाजे रु. १,१५,०००/-. अर्जाचे शुल्क : कोणतेही शुल्क अर्जासाठी घेतले जात नाही. अर्जाचा नमुना (IAF (TA-9) revised Part- I and Part- II) http://www.jointerritorialarmy.gov. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर दि. १९ डिसेंबर २०२३ (१७.०० वाजे)पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. Directorate General Territorial Army, Integrated Headquarters of Ministry of Defence, u th Floor, l Al Block, Ministry of Defence Office Complex, KG Marg, New Delhi – 110001. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे http://www.jointerritorialarmy.gov.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमधील पॅरा १३ मध्ये दिली आहेत.