महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यार्थी पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत, असे वक्तव्य केल्याबद्दल त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रासह आज इचलकरंजी येथे उमटले. इचलकरंजी मनसेच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या वक्तव्याचा निषेध करून विद्यार्थ्यांच्या बद्दल काढलेल्या वक्तव्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांनी बोंब मारो आंदोलन केले. यावेळी गांधी चौकात मनसेच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. त्याच बरोबर अजित पवार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध मनसे अध्यक्ष रवी गोंदकर यांनी केले.यावेळी मनसेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने गांधी चौकात उपस्थित राहिले होते. त्याचबरोबर इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते गांधी पुतळा परिसरात जमा झाले होते. इचलकरंजी शहरात आज दिवसभर अजित पवार यांच्या या वक्तव्याच्या निषेधाच्या अनेक ठिकाणी घटना घडत असतानाच चित्र दिसत होते. यावेळी काँग्रेस मनसे असे अनेक कार्यकर्ते गांधी पुतळ्याजवळ आले होते.