श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये भरवण्यात आलेल्या शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस एस गोंदकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये 5 वी ते 10 वीच्या सुमारे 120 विद्यार्थिनींनी उपकरणासह सहभाग घेतला होता. कार्यक्रमासाठी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस भस्मे मॅडम, कॉलेजचे उपप्राचार्य आर एस पाटील, पर्यवेक्षक व्ही. एन. कांबळे, एस व्ही. पाटील व सौ. व्ही. एस. खोत उपस्थित होत्या.