प्रभाग क्रमांक बारा मधुन नागरिकांना मनोज साळुंखे फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले, जिल्हा सरचिटणीस मनोज हिंगमिरे, माजी आरोग्य सभापती जहांगीर पट्टेकरी,दीपक पाटील, प्रवीण पाटील, संभाजी शिंगारे, सिताराम ओझा, नागोबाई लोंढे, विद्याताई सुतार आदिंची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्या वतीने मनोज साळुंखे फाऊंडेशनच्या माध्यमातून जनसंपर्क कार्यालय येथे तीन दिवस विविध शासकीय योजना कामाबाबत शिबीर आयोजित करण्यात आला होता. या शिबिराचा प्रभागातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पांडुरंग महातुकडे, विजय कोळेकर लालचंद पारी, श्रीनिवास पाटील अरविंद चौगुले, संजय पाटील मोहम्मद अली नदाफ, आदींचा समावेश आहे. प्रारंभ स्वागत करून प्रास्ताविकात माजी शिक्षण समिती सभापती मनोज साळुंखे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. याप्रसंगी बोलताना पैलवान अमृत भोसले यांनी माजी शिक्षण सभापती मनोज साळुंखे मर्यादित न राहता आवश्यक त्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचून गरजुंना नेहमीच मदत करत असतात. आज अशाच लोकप्रतिनिधींची गरज असून सर्वांनी सदैव त्यांच्यासोबत राहावे, अस आवाहन केलं आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.