Logo
ताज्या बातम्या

इचलकरंजी :शहापुरात यंत्रमाग कारखान्यास आग

शहापूर येथील एअरजेट यंत्रमाग कारखान्यास शॉर्टसर्किटने आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. इचलकरंजीतील अग्निशमन बंबाने आग आटोक्यात आणली. याबाबतची नोंद अद्यापही शहापूर पोलिस ठाण्यात झाली नाही. शहापूर खंजिरे औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट नं. एसएस ६/११ व १२ मध्ये स्नेहा टेक्स्टाईल व निखिल टेक्स्टाईल या नावाने एअर जेट यंत्रमाग कारखाना आहे. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास यंत्रमागास शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. बघता बघता अगीने रौद्ररूप धारण केले. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नेमका आकडा समजू शकला नाही