Logo
ताज्या बातम्या

इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! दहावी पास उमेदवारांना ISROमध्ये मिळू शकते नोकरी, ३१ डिसेंबरपूर्वी करा अर्ज

इस्रोमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. येथे टेक्निशियन – बी पदांसाठी रिक्त जागा आहे. यासाठीची नोंदणी लिंक ९ डिसेंबर २०२३ पासून उघडली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ आहे. ‘या’ पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो. हे करण्यासाठी, इस्रोच्या वेबसाइट isro.gov.in. येथे भेट देऊन अर्ज करू शकता आणि या पदांचे तपशील देखील जाणून घेऊ शकता. कोण अर्ज करू शकतो या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, त्याच्याकडे संबंधित क्षेत्रात आयटीआय डिप्लोमा देखील असावा. हा डिप्लोमा NCVT द्वारे मान्यताप्राप्त असावा. इस्रोच्या ही भरती राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) साठी होणार आहेत. पात्रता: टेक्निशियन – बी (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक): या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार SSC पास असावा आणि उमेदवारकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला असावा, तसेच NCVT मधून इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उतीर्ण असावा. टेक्निशियन – बी (इलेक्ट्रिकल): या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार SSC पास असावा आणि उमेदवारकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला असावा, तसेच NCVT मधून इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उतीर्ण असावा. टेक्निशियन – बी (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक): या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार SSC पास असावा आणि उमेदवारकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला असावा, तसेचNCVT मधून इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उतीर्ण असावा. टेक्निशियन – बी (फोटोग्राफी): या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार SSC पास असावा आणि उमेदवारकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला असावा, तसेच NCVT मधून डिजिटल फोटोग्राफी/फोटोग्राफी ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उतीर्ण असावा. टेक्निशियन – बी (डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर): या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार SSC पास असावा आणि उमेदवारकडे माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला असावा, तसेच NCVT मधून डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर ट्रेडमध्ये ITI/NTC/NAC उतीर्ण असावा. वयोमर्यादा पात्र उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. वयोमर्यादेत SC/ST उमेदवारांना ५ वर्ष आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षाची सुट दिली जाईल. निवड कशी होईल? निवड कशी होईल? लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी चाचणी: ८० बहु-पर्यायी प्रश्न. कालावधी: १ तास ३० मिनिटे. चुकीच्या उत्तरांसाठी -०.३३ गुण वजा करून प्रत्येक योग्य उत्तराला एक गुण मिळतो. कौशल्य चाचणी: एकूण गुण: १०० उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांनी लेखी परीक्षेत ८० पैकी किमान ३२ गुण आणि कौशल्य चाचणीत १० पैकी ५० गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे किमान १० उमेदवारांसह कौशल्य चाचणीसाठी निवड १:५ च्या प्रमाणात केली जाईल. कौशल्य चाचणी हैदराबाद येथे बॅचमध्ये घेतली जाईल, जी मूल्यमापन परिणाम विरुद्ध रिक्त पदांशी जुळवली केली जाईल. अर्ज शुल्क अर्ज शुल्क १०० रुपये आहे. पण, सुरुवातीला सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क प्रक्रिया शुल्क म्हणून ५०० रुपये भरावे लागतील. एकूण ५४ पदे भरण्यात येणार आहेत. अधिसुचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.isro.gov.in/media_isro/pdf/recruitmentNotice/2023_December/NRSC_RMT_4_09122023.pdf तुम्हाला किती पगार मिळेल? या पदांवर निवड झाल्यास, उमेदवारांना २१७०० रुपये ते ६९,१०० रुपये मासिक वेतन मिळेल. यासोबतच भारत सरकारच्या नियमांनुसार अनेक भत्तेही दिले जाणार आहेत. पदानुसार पात्रतेपासून पगारापर्यंत सर्व काही भिन्न असू शकते. सर्व तपशील जाणून घेण्यासाठी वेबसाइटवर दिलेली सूचना तपासून घ्या