शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला आहे. आता अंतिम सुनावणी सोमवार, 18 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केला असून, शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. 18 ते 20 डिसेंबर या तीन दिवसांत सुनावणी पूर्ण होणार असून, उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे.
दोन्ही गटांकडून आज उलट तपासणी साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आज शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि भरत गोगावलेंची साक्ष नोंदवली. आता 15 डिसेंबरपर्यंत लेखी युक्तिवाद होणार असून, सोमवारी अंतिम सुनावणीला सुरुवात होईल. उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे.