Logo
ताज्या बातम्या

संसद भवन हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधान मोदींकडून आदरांजली

13 डिसेंबर २००१ रोजी संसदेवर झालेल्या हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहिली. त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यासह इतर नेत्यांनी देखील संसदेत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी संसदेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.