Logo
ताज्या बातम्या

केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया मुलाखतीद्वारे पार पडणार आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख ४ डिसेंबर २०२३ असून यासाठी सर्व उमेदवारांनी हजर राहणं आवश्यक आहे. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी एकूण पदसंख्या – १२ शैक्षणिक पात्रता – MBBS, Internship शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा. नोकरी ठिकाण – जगदलपूर, गुवाहाटी, श्रीनागा, नागपूर, भुवनेश्वर वयोमर्यादा – ७० वर्षे निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे मुलाखतीची तारीख – ४ डिसेंबर २०२३ अधिकृत वेबसाईट – https://crpf.gov.in/ पगार – वैद्यकीय अधिकारी – पदानुसार महिना पगार ७५ हजार रुपये दिला जाणार आहे. सूचना – निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ४ डिसेंबर २०२३आहे. मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा. https://drive.google.com/file/d/18yOIRhpylldb-wfk5jdzSO2plpzO-ohU/view?pli=1