संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. अधिवेशन १९ दिवसांचे असून, कामकाजासाठी १५ सत्र होणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणा, छत्तीसगड या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच अधिवेशन सुरू होईल.