भारताने नौदलासाठी फ्रान्सकडून २६ राफेल विमान खरेदीवर शिक्कामोर्तब केला आहे. भारतीय नौदलासाठी भारत फ्रान्सकडून २६ नाविक राफेल विमान खरेदी करणार आहे. राफेट लढाऊ विमानांच्या खरेदीच्या निर्णयाबद्दल फ्रान्सला औपचारिकपणे कळवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.भारतीय संरक्षण मंत्रालयाने जुलैमध्ये फ्रान्सकडून राफेल (सागरी) लढाऊ विमाने खरेदी करण्यास मंजुरी दिली होती. तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नुकत्याच झालेल्या पॅरिस भेटीदरम्यान राफेलच्या नौदल आवृत्तीच्या खरेदीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर भारताकडून राफेट लढाऊ विमानांच्या खरेदीच्या निर्णयाबद्दल फ्रान्सला औपचारिकरित्या पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने, उपकरणे खरेदीसाठी औपचारिक प्रक्रिया सुरू
फ्रान्सकडून खरेदी करण्यात येणारी ही २६ लढाऊ राफेल विमानं स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजावर तैनात केली जाणार आहेत, असे देखील सांगण्यात आले आहे. फ्रान्स आणि भारतातील हे ५० हजार कोटींच्या डीलसाठी फ्रान्स सरकारला विनंती करण्यात आली आहे. दरम्यान भारताने आता २६ राफेल-सागरी लढाऊ विमाने आणि संबंधित उपकरणे खरेदी करण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे, असे देखील वृत्तात म्हटले आहे.