इचलकरंजी महानगरपालिका मराठी शाळांच्या दुरुस्ती संदर्भात महापालिका प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यासह शहापूर ते कोल्हापूर पायी चालत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर शाळेच्या दुरुस्ती कडे होत असलेले दुर्लक्ष्याच्या निषेधार्थ बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. इचलकरंजी महापालिका हद्दीतील शहापूर मधील मराठी शाळा क्रमांक 14 55, 36, 43 या शाळांच्या दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या शाळेच्या भोवती मजबूत तटबंदी करणे, प्रत्येक शाळेला ग्राउंड वर खेळाचे साहित्य बसवणे, शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवणे, कायमस्वरूपी शिपाई प्रमुख नेमणे, शाळेसमोर 25% ग्राउंड पेविंग ब्लॉक करणे, रात्री सुरक्षारक्षक नेमणूक करणे आदि मागण्यांच्यासाठी बहुजन पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष सिंधुताई बुचडे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासह कार्यकर्त्यांची शाळा भरवली. अशी विविध आंदोलने करूनही काही मिळालेच नाही, यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले असल्याची माहिती बहुजन पँथर च्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.