राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीच्या वर्चस्वाचा इचलकरंजीत भाजप तर्फे जल्लोष. राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी यश संपादन करून सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला, त्यामुळे भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव साजरा करण्यात आला. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भारतीय जनता पार्टीने तब्बल 700 च्या पुढे ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करून राज्यात एक नंबरचा पक्ष भरला आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला जनतेने पूर्णपणे नाकारली असून, पंचायती पार्लमेंट विकास विमुख भाजप महायुतीला जनतेने कौल दिला आहे. तसेच शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले यांनी बोलताना मत व्यक्त केले.