आज २४ रोजी रास्ता रोको आंदोलन होणार आहे. आंदोलन करून न्याय मिळवणे, यासाठी आंदोलक रास्ता रोको होणार आहे. गावागावात रास्ता रोकोचं आंदोलन होईल. पण, रास्ता रोको आंदोलन शांततेत करायचे आहे. सकाळी ११ वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन होईल. नंतर दुपारी १ वाजेनंतर धरणे आंदोलन होईल.
जरांगे म्हणाले, तीन राजांना जनतेची काही काळजी नाही. २५ तारखेला बैठक होईल. काल आणि परवा रात्री काही गोष्टी घडल्या आहेत. त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. यावर तुमच्याशी सविस्तर बोलायचं आहे. सगेसोयरांच्या अंमलबजावणीवर आम्ही ठाम आहोत. उद्या बैठक होणार आहे. अंतरवाली सराटीमध्ये सर्वांनी यावं. काय काय घडलंय आणि निर्णय जनतेला विचारल्याशिवाय घेता येणार नाही. उद्या शेवटची निर्णायक बैठक ठरणार.
जरांगे यावेळी म्हणाले, मोबाईलमध्ये तरुणांनी शूटिंग करायचं आहे, बाहेरचे लोकं कुणी आंदोलनात घुसतात काय हे पाहायचं आहे. ३ मार्चला शेवटचा रास्ता रोको असेल. बदल केला म्हणजे माघार घेतली असे नाही. ३ मार्चला मोठा रास्ता रोको होणार आहे. मी आता तर हारतचं नाही. नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
नको ते आरक्षण आमच्यावर थोपवत आहेत. सरकार रडीचा डाव खेळतंय, आम्हीही डाव बदलणार.