Logo
राजकारण

हातकणंगले जागेवर राजू शेट्टी यांच्याबद्दल विचार करू : खासदार संजय राऊत

मुंबई उत्तर, हातकणंगले जागेबाबत लवकरच जाहीर करू. स्वाभिमानेच राजू शेट्टी यांनी हातकणंगले मतदार संघात मविआचा पाठिंबा मागितला आहे. (Lok Sabha Election 2024 ) हातकणंगले जागेवर राजू शेट्टी यांच्याबद्दल विचार करू, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. राऊत म्हणाले, जळगाव पालघर, कल्याण, डोंबवली, मुंबई उत्तर आहे, उमेदवार निश्चित झालेले आहेत. दुसरी यादी येत्या २४ तासात किंवा २ दिवसात जाहीर होईल. मी पंतप्रधान नरेंद्र मोंदी विरोधात कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही. वंचितला आम्ही ५ जागांचा प्रस्ताव दिला आहे. प. महाराष्ट्रात आम्हालाही जागा हवी आहे. प. महाराष्ट्रात आमच्याकडे जागा नाही. प. महाराष्ट्रात आमच्याकडे एक जागा असावी, असे आम्हाला वाटते. शिवसेनेने ज्या जागांवर घोषणा केली आहे, उमेदवारांचा तिथे तिढा आहे, असे अजिबात नाही. उरलेल्या उमेदवारांची लवकरच घोषणा होईल. जे जायचे ते डरपोक लोक आहे, आम्ही लढू. अमोल किर्तीकर कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे राऊत यांनी यावेळी नमूद केले. त्यांनी जाहिर झालेल्या उमेदवारांची नावे वाचून दाखवली. यात बुलढाणा-नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशीम – संजय देशमुख, सांगली-चंद्रहार पाटील, संभाजीनगर-चंद्रकांत खैरे, रायगड- आनंद गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत, मुंबई दक्षिण -अरविंद सावंत, ठाणे – राजन विचारे, परभणी-संजय जाधव, धाराशिव-ओमराजे निंबाळकर, मुंबई वायव्य-अमोल किर्तीकर असे १७ उमेदवार आहेत. जागांचा निर्णय मविआत एकमताने झालाय. छ. संभाजीनगरमध्ये कोणाचीही नाराजी नाही. मुंबईतून ४ उमेदवार जाहीर झाले. कल्याणच्या उमेदवाराची घोषणा पहिल्या यादीत नाही.