जगभरात सध्या पर्यावरण हा गंभीर विषय आहे. वाढते तापमान आणि या घातक परिणामांची चर्चा सध्या जगभरात सुरु आहे. राज्यातील सध्याच्या प्रदूषणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज (दि.९) बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षानिवासस्थानी होणार आहे.
‘प्रदूषणमुक्त दीपावली
दरम्यान ‘प्रदूषणमुक्त दीपावली संकल्प अभियान -2023’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. ८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदूषणमुक्त सण साजरे करण्याचा संकल्प करण्याची शपथ दिली. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक व पणन मंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते. प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.